सोलापूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ



सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर जिल्ह्यात बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अवकाळी पाऊस सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पंढरपूर, माळशिरस व सांगोला तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. जिल्ह्यातील इतर भागातही दिवसभर ढगाळ वातावरण होते तर, काही भागात रिमझिम पाऊस झाला.

(Advertise)

रब्बी हंगामाचा धारणा झालेल्या पिकांचे अवकाळीी पावसामुळे नुकसान होण्याच्या भीती भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहे यामध्ये गहू, हरभरा, करडी, द्राक्ष, डाळिंब, कांदा या फलधारणा झाली आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामध्येे सध्या ऊस तोडणी चालू आहे अवकाळी पावसामुळे ऊस शेताबाहेर ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांना आलेलीआहे त्यामुळे आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळे ऊस तोडणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे मंगळवेढा येथे ज्वारीचे पीक अवकाळी पावसामुळे धोक्यात येण्याची चिंता आहे. त्यात ज्वारी पिकाला विमा नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Post a Comment

0 Comments