गुरुजींनी दिलेले चेक वटले नाहीत; सोलापूर जिल्ह्यातील १६ शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल

  
सोलापूर/प्रतिनिधी: 

कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी दिलेले धनादेश न वटल्याने सोलापुरातील न्यायालयात सहा मुख्याध्यापक व दहा शिक्षकांवर फौजदारी फिर्याद दाखल करण्यात आल्याची माहिती सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉइज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई या संस्थेचे सोलापूर जिल्हा वसुली अधिकारी विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर शाखेतून प्रकाश जकप्पा कोळी, संतोषकुमार दत्तू घोडके, मुझबेर अ.गनी हिप्परगी, आण्णप्पा गिनानी सतुबर, काशीनाथ शंकर राठोड, बाळासाहेब गोपीनाथ आवारे, भालचंद्र बाबू हंचाटे, कळसप्पा कवडेश्वर मंद्रूपकर, अंजूम परवीन शेख , नागनाथ लक्ष्मण म्हमाणे, सोमनाथ गुरुनिंगप्पा तोळणुरे, संतोष गुराप्पा भद्रशेट्टी, संजय दत्तात्रय पुजारी, ज्ञानेश्वर मधुकर अंकुशराव , राजकुमार खंडप्पा कस्तुरे, महादेव गंगाप्पा कोळी या शिक्षकांनी वैयक्तिक कर्जापोटी प्रत्येकी २५ लाख रुपये कर्ज घेतले. परंतु वेळेवर कर्जफेड केली नाही.

उलट संस्थेस कर्जाच्या हप्त्यासाठी न वटणारे धनादेश दिले. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी फौजदारी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments