‘पत्रकारिता शोध आणि बोध’ पुस्तकाचेशिवाजी विद्यापीठात गुरूवारी प्रकाशनकोल्हापूर,ता.२२ :

 शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने गुरूवार दि. २५ रोजी सकाळी साडेदहा वाजता पत्रकार सचिन मदनराव वायकुळे लिखित ‘पत्रकारिता शोध आणि बोध’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात हा समारंभ होईल. 

पुण्याच्या दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणीस आणि कोल्हापूर महापालिकेचे उपायुक्‍त विनायक औंधकर प्रमुख पाहुणे आहेत. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.सुनिलकुमार लवटे आहेत. यावेळी सांगली जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, मिरज-कुपवाड नगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला पत्रकार, विद्यार्थी आदींनी उपस्थित राहावे,असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ.शिवाजी जाधव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments