लॉकडाऊन काळात चोरून दारु विकणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील १३ दारु दुकानांचे परवाने कायम स्वरुपी रद्द


करमाळा/प्रतिनिधी:

 सोलापुर जिल्ह्यात लॉकडाउनच्या काळात परमिटरूम, बिअर-बार,बिअर शॉपी व वाईनशॉप बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यात सगळीकडे परमिटरुम बंद होते परंतु लॉकडाउनच्या काळात काही परमिटरुम धारकांनी जास्त भावाने दारू विक्री करुन सर्व स्टॉक संपवलेला होता.

परत प्रशासनाला स्टॉक देताना यांना अडचण येणार असल्याने व्यवस्थीत स्टॉक दाखवण्यासाठी बरेच दारु दुकानदारांनी डुप्लीकेट दारुचा स्टॉक दाखवला असल्याची तक्रार व लॉकडाउनमध्ये दारुविक्री करीत असल्याची तक्रार टेंभुर्णीचे सामाजिक कार्येकर्ते बशीर जहागीरदार यांनी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य व दारुबंदी मंत्रालय यांचेकडे केली होती.

(Advertise)

त्याची गंभीर दखल घेत राज्यमंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य यांनी याविषयी तातडीने चौकशी करुन कारवाईचे आदेश १५ जूलै रोजी दिले होते. तक्रारदार टेंभुर्णीचे सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागीरदार
अनेक बिअर-बार, परमिट रूम, वाईनशॉप व बिअर शॉपिच्या मालकांनी त्यांच्या जवळचेसर्व अधिकृत स्टॉक जास्त भावाने विकुन संपवले होते. उलट परत विक्रीसाठी माल कमी पडले म्हणुन डुप्लीकेट माल आणून विकले होते.

हा सर्व प्रकार उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेले आहे.सोलापुर जिल्ह्यात पंढरपर येते उत्पादन शुल्क अधिकारी लॉकडाउनच्या काळात दारू विकताना सापडले होते त्यांचेवर गुन्हा दाखल करुन सेवेतून निलंबित देखील करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments