प्रेरणादायी! बाळासाहेब कांबळे यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मान


कोल्हापूर/प्रतिनिधी:

 महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने प्रत्येक वर्षी ९ फेब्रुवारीला रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार व कामगार भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, या वर्षी ३३ वा पुरस्कार वितरण सोहळा हुतात्मा बाबू गेनु गिरणी कामगार भवन ,सेनापती बापट मार्ग मुंबई येथे मोठ्या दिमाखात पार पडला. 

यावेळी-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ संभाजी नगर आगार कोल्हापूर विभाग येथे चालक पदी असलेले बाळासाहेब हिंदुराव कांबळे (दिंडनेलीऀकर) यांना २०१५ सालचा गुणवंत कामगार पुरस्कार महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, यावेळी कामगार राज्यमंत्री  ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद सिंघल , कामगार आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, विकास आयुक्त पंकज कुमार, कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित होते.

(Advertise)

 बाळासाहेब कांबळे हे  २००० सालापासून एसटी महामंडळाचे बस चालक म्हणून काम करत आहेत त्यांना कोल्हापुर विभागातील कामगार कल्याण मंडळाच्या गुणवंत कामगार पुरस्काराचे प्रथम (चालक) मानकरी होण्याचा मान मिळाला त्यांनी २००५ पासुन एसटी बस मध्ये प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, मोबाईल चार्जिंग सुविधा , वर्तमानपत्रे,१५० पुस्तकांचे फिरते वाचनालय, सुट्टे पैसे प्रथमोपचार पेटी, औषधे, कचरा पेटी, आदी सोई सुविधा उपलब्ध करून देत आहेत तसेच जनकल्याण सामाजिक सेवा संस्था दिंडनेलीऀ कोल्हापूर या संस्थेत  संचालक असलेने संस्था राबवत असलेल्या वृक्षारोपण, झाडे वाटणे, पर्यावरण रक्षण,लेक वाचवा अभियान, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, रक्तदान, नेत्रदान, देहदान, पुरस्कार वितरण सोहळे,  सर्वच राष्ट्रीय महापुरुषांची जयंती साजरी करणे, पक्षांसाठी घरटी बांधणे, कुष्ठरोगी ,अनाथ मुलं यांना मदत , रस्ता सुरक्षा अभियान, आदी सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेतात त्यांनी आदर्श वाहनचालक बना अपघात टाळा हे पुस्तक लिहिले व त्याच्या हजारो प्रती रस्त्यावरील अनेक चालकांना  वाटल्या, व अपघात विरहित वाहन चालविणे साठी प्रबोधन केले. 

यांना आतापर्यंत २७ संस्थांनी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले आहे तर कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी केलेबददल १३ संस्थांनी  सन्मानीत केले आहे , त्यांनी एसटी बस चालक म्हणून २० वर्ष विना अपघात सेवा बजावली आहे, इंधन बचत करुन महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केला आहे  यासाठी जनकल्याण सामाजिक सेवा संस्था दिंडनेलीऀ कोल्हापूर संस्थेचे अध्यक्ष श्री उदयसिंह पाटील यांचे मार्गदर्शन लाभते   व वडील कै, हिंदुराव शंकर कांबळे (सामाजिक कार्यकर्ते ), चुलते कै,बापु शंकर कांबळे (समाज सुधारक) यांच्यापासून प्रेरणा मिळाली आहे.

बाळासाहेब कांबळे बद्दल विशेष-

रक्तदान शिबिरांचे आयोजन  केले आहे, स्वतः व त्याच्या पत्नीने देहदान संकल्प केला आहे, अनेकदा रक्तदान केले आहे, नेत्रदान करण्याचा संपूर्ण कुटुंबाचा संकल्प आहे.
एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभाग मध्ये १२ आगार व २ कार्यशाळा १४ आस्थापनातुन ३३ वर्षांत  (चालक )प्रथम मानकरी होण्याचा मान बाळासाहेब यांना व संभाजी नगर आगारास  मिळाला आहे,  कामगार कल्याण मंडळाचा हा ३३ वा पुरस्कार वितरण सोहळा आहे. पुरस्काराचे स्वरूप- सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, २५००० रूपयेचा धनादेश मेडल, इत्यादी

Post a Comment

0 Comments