कन्हैयाकुमारच्या सभेस परवानगी नाकारली



ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियातर्फे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दसरा चौकात कन्हैयाकुमार यांच्या सभेचे २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आयोजन करण्यात आले होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून प्रशासनाने सभेस परवानगी नाकारली आहे.

कन्हैयाकुमार यांनी बिहारमध्ये गिरीराजसिंह यांच्याविरुद्ध लोकसभेची निवडणूक लढविली होती. भाजपविरोधात कन्हैयाकुमार यांनी जोरदार मोहीम उघडली असून शनिवारच्या सभेत ते काय बोलतात याकडे लक्ष लागले होते. पण प्रशासनाने कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभेस दिलेली परवानगी नाकारली आहे

Post a Comment

0 Comments