रेल्वे मध्ये अपरेंटिच्या २५०० पदांसाठी नोकरीची संधी



मध्य रेल्वेच्या रेक्रुटमेंट बोर्डाने अपरेंटिसच्या पदासाठी नोकर भरती करण्यासंदर्भात एक नोटीस जाहीर केली आहे. या अंतर्गत मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूरसह अन्य काही ठिकाणी नोकर भरती होणार आहे.

यासाठी एकूण २५०० पद रिक्त रिक्त असून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाईट: www.rrccr.com/Home 

शैक्षणिक पात्रता:
या नोकर भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून १० परीक्षेत कमीतकमी ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय १५ ते २४ दरम्यान असणे गरजेचे आहे. परंतु राखीव वर्गासाठी वयोगटासाठी सूट दिली जाणार आहे. 

फी:
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.अधिक माहितीसाठी उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Post a Comment

0 Comments