मंगळवेढा/प्रतिनिधी:
राज्यातील सहकारी संस्थेच्या निवडणूकामध्ये सारखे बद्दल होत नाही. कोरोना महामारी मूळे निवडणुका होऊ शकले नाही. या निवडणुका जुन्या नियमानुसार होणार त्याची प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे आश्वासन राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मंगळवेढा येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
दिवंगत आ. भारत नाना भालके यांच्या जयंतीनिमित्त युवा नेते भगीरथ भालके यांनी मंगळवेढा येथे जनसंवाद यात्रेचा शुभारंभ सहकार मंत्री पाटील यांच्या हस्ते केला. यावेळी माजी आ. राजन पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. संजय मामा शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे कागदपत्रे तपासून कारवाई होणार
मंगळवेढा तालुक्यातील श्री दामाजी साखर कारखान्यातील १९ हजार सभासदांना क्रियाशील व आणि अक्रियाशील अशा नोटिसा पाठवण्यात आले आहे. याबाबत भगीरथ भालके यांना याबाबत माहिती दिली आहे चौकशीअंतर्गत निर्णय घेण्याचे आश्वासन बाळासाहेब पाटील यांनी दिली. तसेच ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना फसवून कर्ज घेतले असे झाले असेल तर ते पूर्णपणे चुकिचे आहे. यात साखर कारखान्याबरोबर बँकाही दोषी आहेत. कर्ज प्रकरणात बँक शेतकरी आल्याशिवाय कर्ज देत नाही. मात्र तरी कर्ज घेतलेल्या त्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे दिली आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई करणार अशी माहिती पाटील यांनी दिली.
साखरेचे उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट..
राज्यातील साखर कारखान्यांचे गाळप मोठ्या प्रमाणावर होत आहे. गाळप बाबतीत दर दिवशी आकडे वाढत आहेत. साखर उत्पादन क्षमतेपेक्षा जास्त झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी साखरेचे प्रमाण अधिक होताना दिसत आहे. एमएसबी वाढवण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विनंती केली आहे.
उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेणार
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील उमेदवारीबाबत पाटील बोलताना म्हणाले, याबाबतीत समाजाच्या दृष्टिकोनातून व जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे कोणत्याही प्रकारचे उमेदवार बाहेरील पक्षात नसणार आहे, याबाबत सर्व निर्णय पक्षातील नेते घेतील अशी भूमिका पाटील यांनी मांडले.
0 Comments