बार्शी च्या तरुणाचा यूपीएससी मध्ये झेंडा ; शरण कांबळे देशभरात ८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण


वैराग/प्रतिनिधी:

 बार्शी तालुक्यातील तडवळे गावचे शरण गोपीनाथ कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट २०१९मध्ये घेण्यात आलेल्या सीएपीएस असिस्टंट कमांडंट ( ग्रुप ए ) परीक्षेमध्ये देशात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी आई-बापाच्या कष्टाचं जीझ झालं आहे. 

(Advertise)

शरण यांच्या निकालाची वार्ता कळताच गावकऱ्यांनी जल्लोष केला, आपला लेक एवढा मोठा साहेब झाला, या आनंदाने आई-वडिलांना आकाश ठेंगणे झाले. भूतकाळाती आठवणी जागवताना, वडील गोपीनाथ आणि आई  सुदामती यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तर, थोरला भाऊ दादासाहेब यानंही लहान्या भावाचं अभिनंदन केलं, गावातील मित्रांनी एकत्र येऊन शरणच्या गळ्यात हार घालून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

Post a Comment

0 Comments