केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनचा आज ७५ वा दिवस आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलनाचं सिंधू बॉर्डरवर असलेलेलं केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनलं आहे. त्यात हे आंदोलन २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत सुरूच राहणार अशी हाक शेतकरी संघटनेने दिली होती.
शेतकरी आंदोलनाची दखल आता जागतिक पातळीवर घेण्यात येत असून पॉप स्टार रिहाना व पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली होती. त्यात सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने देखील अशीच भूमिका मांडली होती. मात्र सचिनच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्याला मोठा विरोध करण्यात आला होता. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपले क्षेत्र नाही त्यावर भाष्य करणे टाळावे असा सल्ला त्याला दिला होता. यावरूनच अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे.
‘सचिन तेंडुलकरने क्रिकेट सोडून दुसऱ्या विषयावर बोलू नये पण पवार ब्रम्हांड ज्ञानी असल्यामुळे इतिहासाबद्दल पण बोलणार. किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी’? असा घणाघात भातखळकर यांनी केला आह्रे. यावर आता राष्ट्रवादी काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.
0 Comments