अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर सडकून केली आहे.
देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्या राज्यांना अर्थसंकल्पात बरंच गिफ्ट मिळालंय. महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावं लागेल, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. पण बजेटमध्ये त्यावर काहीच तरतूद केलेली दिसत नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.
कोरोना काळात कोविडसाठी केंद्र सरकारने २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्या पॅकेजचं काय झालं? असा सवाल करतानाच जे बजेट जाहीर झालं ते या राज्यांना कसं मिळणार? हे सरकारनं जाहीर करावं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
0 Comments