भाजप नेते निलेश राणेंनी खासदार विनायक राऊत यांनी धमकी दिल्यापासून सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. वादाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत दंगल नियंत्रण पथके तैनात केली गेली असून, पोलीसही सज्ज झालेत. राणेंच्या धमकीनंतर शिवसैनिक थेट रस्त्यावर उतरले आहेत.
शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, सतीश सावंत, संदेश पारकर आणि जिल्हाभरातील कार्यकर्ते एकवटले असून, निलेश राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला होता.
निलेश राणेंवर निवेदनाद्वार कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केलीय. निलेश राणेंच्या अशा सततच्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली तर निलेश राणे जबाबदार राहणार असल्याचंही या नेत्यांनी म्हटलं होतं. या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी, असंही शिवसेनेचे सतीश सावंत म्हणालेत होते.
0 Comments