अहमदाबाद महागनगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुतणी सोनल मोदींचे नाव नाही. पक्षाच्या नव्या नियमानुसार सोनल मोदी यांना तिकीट देण्यास नकार दिला आहे.
सोनल मोदी यांनी अहमदाबाद पालिकेच्या बोकडदेव या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मागितले होते. मात्र, भाजपने केलेल्या निकषानुसार ६० वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती, नेत्यांचे नातेवाईक आणि महापालिकेत तीन वेळा कार्यकाळ पूर्ण केलेल्यांना तिकीट मिळणार नाही. सोनल मोदी या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुतणी आहेत. त्यामुळेच पक्षाने त्यांना महापालिकेचे तिकीट दिले नाही.
0 Comments