जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर पोटनिवडणूकी तयारी सुरू


पंढरपूर/प्रतिनिधी;

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे दिवंगत आमदार भारत नाना पाटील यांच्या निधनामुळे  रिक्त झाली आहे, पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडून आता तयारी सुरू करण्यात आली आहे, याबाबतचा आव्हाल जिल्हा प्रशासनाकडून मागविण्यात आला आहे यामुळे इच्छुक उमेदवारांच्या भुऱ्या उंचावले आहे.

करुणा मनमानीमुळे आमदार भारत नाना भालके यांचे पुणे येथे निधन झाले होते, त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोटनिवडणुकीसाठी लागणाऱ्या आवश्यक माहिती मागितली आहे, त्यामध्ये एकूण केंद्रे त्यांमधील अंतर मॅप महत्त्वाची केंद्रे संवेदनशील केंद्रे मतदार यादी याची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाकडून मागवली आहे.

पंढरपूर आणि मंगळवेढा असा मिळून विधानसभा मतदारसंघ आहे. यामध्ये सुमारे अडीच लाख मतदार आहे. २०१९ आली झालेल्या निवडणुकीत तिरंगी लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके विजयी झाले होते.पोटनिवडणुकीत ही जागा बिनविरोध होणार की निवडणूक लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, दीवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. कोणता उमेदवार असणारे याचीही चर्चा जोरदार चालू आहे ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून समाधान आवताडे यांनी दावेदारी मजबूत केली आहे.

Post a Comment

0 Comments