मोटर सायकल चोरी करणारे आरोपी सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या जाळ्यात; केला लाखो किमतीचा माल हस्तगत


सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये दुचाकी मोटार सायकल चोरीचे प्रकार घडले होते, त्या यावत विविध पोलीस ठाणेस गुन्हे दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्यांचा अभ्यास करून तसेच अभिलेखावरील आरोपी तपासून गुन्हे उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन केले होते.

त्याअनुषंगाने दि.३०/०१/२०२१ रोजी सपोनि अजित कुंभार व पथकातील पोलीस अंमलदार असे अभिलेखावरील पाहिजे/फरारी, तसेच माला विषयक गुन्हयातील गुन्हेगारांचा शोध कामी पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना.गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, इसम नामे अमोल महादेव धोत्रे, रा. मु.पो. अणदूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद व शरिफ मौला शेख, रा. इटकळ, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद हे दोघे चोरीच्या युनिकॉर्न व बजाज डिस्कव्हर मोटार सायकलवरून हैद्राबाद रोडवरुन सोलापूर शहरात मंत्री चंडक पार्क जवळ विक्रीसाठी येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती.

(Advertise)

त्याप्रमाणे सपोनि अजित कुंभार व पथकातील पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासह मंत्री चंडक पार्क. हैद्रबाद रोड सोलापूर येथे सार्वजनिक रोडवर सापळा लावला. थोडयाच वेळात, बातमीतील वर्णनाचे दोन इसम त्यापैकी एक इसम युनिकॉर्न व एक इसम बजाज डिस्कव्हर मोटार सायकलवरून येत असताना दिसले त्यांना थांबणे बाबत हाताने इशारा केला असता ते मोटार सायकल वरून पळून
जाणेच्या प्रयत्न करीत असताना सपोनि अजित कुंभार व पथकतील अंमलदार यांनी पकडले.संशयीत इसम अमोल महादेव धोत्रे यास विश्वासात घेवुन तपास केला असता, त्याने सदरची मोटारसायकल ही चालु महिन्यात दि.०३/०१/२०२१ रोजी तो तसेच त्याचे सोबतचा त्याचा साथीदार शरिफ शेख व त्याचा अन्य एक साथीदार असे तिघे मिळुन स्विष्ट डिझायर कार क्र. एम.एच.०२ बी.डी.४३७८ मधुन येवुन मित्र नगर, शेळगी, सोलापूर येथील एका घरा समोरून चोरी केली असल्याचे तसेच त्याचे साथीदाराकडे असलेली मोटार सायकल देखील चोरीचीच असल्याचे सांगितल्याने, सदर मोटार सायकली
चोरी बाबतचे अभिलेखाची पडताळणी केली असता, जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं.०८/२०२१ भा.दं.वि.सं.कलम ३७९ व जेलरोड पो.स्टे सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. १२५१/२०२० भा.दं.वि कलम ३७९ प्रमाणे मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याची खात्री झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.


अटक कालावधीत अमोल धोत्रे याचेकडे त्यास विश्वासात घेवुन कौशल्याने तपास केला असता, त्याने त्याचा अन्य एक पाहिजे असलेला साथीदार याचे मदतीने, चोरलेल्या आणखी ०७ मोटार सायकली काढुन दिल्या. सदर आरोपीतांनी एकुण ०९ चौरीच्या मोटार सायकली काढुन दिल्या त्या सविस्तर पंचनाम्याने जप्त करण्यात आल्या आहेत.अटक आरोपी नामे अमोल महादेव धोत्रे शरिफ शेख व त्याचा पाहिजे असलेला साथीदार असे तिघांनी मिळुन (१) जो.पेठ पो.स्टे सोलापूर शहर गुन्हा रजि नं. ०८/२०२१ भा.दं.वि कलम ३७९ हा गुन्हा तसेच अमोल धोत्रे व त्याचा पाहिजे असलेला अन्य एक साथीदार असे दोघांनी मिळुन (२) जेलरोड पो.स्टे सोलापूर शहर गुन्हा रजि. नं. १२५१/२०२० भा.दं.वि कलम ३७९ (३) फौजदार
चावडी चावडी पो.स्टे सोलापूर शहर गुन्हा रजि नं. १०१६/२०२० भा.दं.वि कलम ३७९ (४) विजापूर नाका पो.स्टे सोलापूर शहर गुन्हा रजि नं. ६२५/२०१९ भा.दं.वि कलम ३७९ (५) सोलापूर तालुका पो.स्टे सोलापूर ग्रामीण गुन्हा रजि नं. १२/२०२१ भा.दं.वि कलम ३७९ (६) सोलापूर तालुका पो.स्टे सोलापूर ग्रामीण गुन्हा रजि नं. १४/२०२१ भा.दं.वि कलम ३७९ (७) उमरगा पो.स्टे जिल्हा उस्मानाबाद गुन्हा रजि नं. ४३३/२०२० भा.दं.वि कलम ३७९ प्रमाणे असे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर अटक आरोपीतांकडुन पोलीस अभिलेखावरील दाखल गुन्हयातील ०७ दुचाकी मोटार सायकली किंमत रु. २.२५,०००/- रु किंमतीच्या तसेच त्यांचे ताव्यात मिळुन आलेल्या त्यांनी कर्नाटक राज्यातील आळंद येथुन चोरलेल्या दोन मोटार सायकली किंमत रु. ७०,०००/- अशा एकुण ०९ दुचाकी मोटार सायकली एकूण किंमत रु. २.९५,०००/- च्या काढुन दिल्याने व गुन्हयात वापरलेली एक सिल्व्हर रंगाची मारुती स्विष्ट डिझायर कंपनीची चारचाकी कार क्र. एम.एच.०२ बी.डी. ४३७८ किं. रु. ३.५०,०००/- ची असा एकुण ६,४५,०००/- रु. किंमतीचा मुददेमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करण्यात केला.


 


Post a Comment

0 Comments