तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याकडे वाईट नजरेने एकटक बघणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शुक्रवारी सुनावली. दामोदर कन्हैय्या राबडा असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी ही ४ मे २०१७ रोजी व्यंकटेशनगर येथील घरातून समोरील बगिच्यामध्ये सायकल खेळण्यास गेली होती. मागील २०-२५ दिवसांपासून पाठलाग करणारा दामोदर हा पीडितेकडे बाहेर उभा राहून वाईट नजरेने एकटक पाहात होता. शालेय साहित्य आणण्यासाठी फिर्यादी जात असतानाही पाठलाग करायचा. एके दिवशी मामाच्या घरी जात असतानाही आरोपी मागे आला व बाहेर उभा राहून एकटक पाहात होता. त्याबाबतची माहिती मामाला दिली. मामाने व इतरांनी मिळून आरोपीला पकडून जिन्सी पोलीस ठाण्यात नेले.
0 Comments