संजय राठोड भेटले तर निरोप देता की, पञकार तुमची वाट बघताय म्हणून उपमुख्यमंञी अजित पवार यांचे मिश्किल उत्तर


पुणे : पूजा चव्हाणच्या आत्महत्याचे प्रकरण राज्यभर पेटले आहे. या प्रकरणाशी शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यापासून संजय राठोड माध्यमांसमोर आलेले नाही.त्यामुळे संजय राठोड यांच्यावरुन विरोधकांनी सरकारला आणि खासकरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणाविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, संजय राठोड यांची भेट झाली तर सांगेन की, सर्व पत्रकार तुमची आत्मितयेतेने वाट बघत आहे. त्यांची एकदा भेट घ्या, असे म्हणत अजित पवार यांनी यावर अधिक बोलणे टाळले. 

पूजा चव्हाण प्रकरणात त्यांचे नाव आल्यापासून संजय राठोड गायब झाले आहेत. अद्याप ते माध्यमांसमोर आलेले नाहीत. त्यामुळे ते समोर कधी येतील? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला. तेव्हा त्यांची भेट झाल्यानंतर आपण त्यांना तुमची भेट घेण्यास सांगू, असे उत्तर अजित पवार यांनी दिले आहे. तसेच, या प्रकरणात पोलीस तपास करत आहे. ते सत्य समोर आणतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments