खळबळ! कोल्हापूरच्या राजाराम तलावात बॅगमध्ये आढळला महिलेचा अर्धवट देह!


कोल्हापुरातील राजाराम तलावात महिलेचा अर्धवट मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. एका पिशवीत मृतदेह होता. 
 सकाळी या परिसरात फिरायला येणाऱ्यांच्या ही घटना लक्षात आली. राजारामपुरी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.  पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, महिलेची हत्या करून तिचा अर्धवट देह पिशवीत भरून तलावात फेकला. पोलिसांनी पंचनामा करून देह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. महिला वयोवृद्ध असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, महिलेची ओळख पटवण्यात येत आहे. याबाबत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments