कासेगाव येथे भीषण अपघात चार जण जागीच ठार एक जण गंभीर


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे बोलेरो गाडीचा  भीषण अपघातात चार जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. हे सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड या तालुक्‍यातील आहेत पंढरपूर येथे देव दर्शनासाठी आले होते. या अपघातामध्ये एक पुरुषांसह दोन महिला व एक लहान मुलीचा समावेश आहे. हा अपघात सकाळी सहाच्या सुमारास झाला.

सांगोला पंढरपूर रस्त्यावरील कासेगाव येथील सात मैली या भागात उसाचा ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला थांबला असता सांगलीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या बुलेरो कारणे मागून जोरदार धडक झाली यामध्ये कारची पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये चार जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

या अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक अवचर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली आहे गंभीर जखमी झालेल्या पंढरपूर विभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments