पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वहागांव ( ता. कराड) गावच्या हद्दीतून भरधाव वेगाने जाणार्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघाता एवढा भीषण होता की कारचा अक्षरशा चुरडा झाला.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून कार (क्र. एमएच ०७-एबी ५६१०) ही अतिशय वेगात कोल्हापूरहून पुण्याकडे जात होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही कार वहागांव (ता. कराड) गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्यामुळे महामार्ग ओलांडून पुण्याहून कोल्हापूरकडे जाणार्या लेनवर जाऊन ती अज्ञात वाहनावर आदळल्याने भीषण अपघात घडला. ज्यामध्ये तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. याशिवाय एकजण गंभीर जखमी झाला आहे.
घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. कार एवढी वेगात होती की, अपघातानंतर कारमधील पाच जणांपैकी एकाला बाहेर पडता आलं नाही. पाचही जण कार मध्येच अडकून पडले होते. चुराडा झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
0 Comments