रंजन गोगाई यांचे विधान धक्कादायक आणि सर्वांना चिंता करायला लावणारे - शरद पवार



माजी सरन्यायाध रंजन गोगाई यांनी देशाच्या न्यायव्यस्थेविषयी केलेल्या वक्तव्यामुळे देशात खळबळ माजली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पवार म्हणाले, माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा खासदार रंजन गोगाई यांनी न्यायव्यवस्थेविषयी केलेले विधान अत्यंत धक्कादायक आहे. ते या विधानातून न्यायव्यवस्थेचे सत्य सांगण्याचा प्रयत्न करत तर करत नसतील ना हे मला ठाऊक नाही. तसेच त्यांनी केलेले विधान सर्वांना चिंता करायला लावणारे ठरणार आहे.

(Advertise)

देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे. मला विचाराल तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाणार नाही असे मत माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई एका वृत्तवाहिनीशी बोलताना यांनी शनिवारी केले होत.

Post a Comment

0 Comments