ऑनलाइन डेटिंग ऍप वापरताय तर सावधान...

ऑनलाइन डेटिंग ऍप वापरताय तर सावधान. कारण,  पिंपरी-चिंचवडमध्ये एका डेटींग ॲपवर बोगस प्रोफाईल तयार करुन लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी मुलीला अटक करण्यात आली आहे. सायली देवेंद्र काळे असे या मुलीचे नाव आहे. 

पिंपरी चिंचवडमधील गुन्हे शाखा ४ च्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी बंबल आणि टिंडर डेटींग साईटवरून तरुणांसोबत चॅटिंग करायची. त्यानंतर ओळख वाढवून त्यांना हॉटेलमध्ये बोलावत असे. सायलीची आई मानसिक तणावाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे तिच्या गोळ्या सायली नकळत डेट करणाऱ्या व्यक्तीच्या खाण्यात मिसळत. यानंतर तो व्यक्ती बेशुद्ध झाला की, त्या व्यक्तीच्या अंगावरील सोने, पैसे लुटत असे.

(Advertise)

Post a Comment

0 Comments