मंगळवेढा/प्रतिनिधी :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरुण मंडळ, हुलजंती व बौद्ध बांधवांच्या वतीने नूतन सरपंच मिनाक्षी कुरमुत्ते, उपसरपंच बाळासाहेब माळी व नूतन ग्रा.पं. सदस्य शिलवंती येड्डे, अनिता भोरकडे, मंदाकिनी माळी, सविता शिंदे, महादेव पेटर्गे, शांतीलाल भोरकडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच गोविंद भोरकडे, माजी उपसरपंच अशोक भोरकडे, माजी ग्रा.पं. सदस्य गैबी भोरकडे, विकास भोरकडे, सुबाण्णा माळी, पोलीस पाटील जिवाजी सोनवले, कोतवाल गुलाब सोनवले, दादासाहेब सोनवले, कृष्णा भोरकडे, धोंडाप्पा भोरकडे, अरुण भोरकडे, गजेंद्र भोरकडे, नानासाहेब भोरकडे, दिलीप भोरकडे, शेतकरी संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक अमीर आतार, ग्राहक मंच जिल्हा अध्यक्ष श्रीकांत सोमुत्ते (वडीयार), रोहिदास भोरकडे, म्हाळाप्पा पुजारी, महेश पडवळे, लक्ष्मण पौटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष जामदार यांनी मानले.
0 Comments