उद्योगपती अविनाश भोसले यांचा मुलगा ईडीच्या ताब्यात


बांधकाम- हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील अभिल हाऊस या कार्यालयावर अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने छापेमारी केली होती. कारवाईदरम्यान अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यांना चौकशीसाठी रात्री ईडीने अमित यांना मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात आणले आहे.

(Advertise)

फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. विदेशी चलन प्रकरणात अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.ईडीचे अधिकारी सकाळी ८. ३० पासून अभिल कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. आयबीच्या परवानगीविना विदेशी बँकेतील अकाउंटमध्ये ५०० कोटी कसे जमा झाले, असा संशय ईडीला आहे. त्यासंबंधी ईडी अधिक तपास करत आहे. याआधीही नोव्हेंबरमध्ये अविनाश भोसले यांची ईडीने चौकशी केली होती.

Post a Comment

0 Comments