जयंत पाटलांसमोरच राडा; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी


 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांना भिडले. या फ्री-स्टाईल हाणामारीचं कारण काय होतं त्याबाबत अजून माहिती समोर आली नाही. या प्रकारामुळे खानदेशात राष्ट्रवादीमधील गटबाजी समोर आली आहे.

(Advertise)

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी आणि गावागावातील तरुण कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी राज्याचा दौरा काढला आहे. त्यांनी विदर्भातील गडचिरोलीपासून 'राष्ट्रवादी परिवार संवाद' दौऱ्याला सुरुवात केली आहे. पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असताना काही ठिकाणी पक्षांतर्गत वादही उफाळून आल्याचे दिसून आले आहे.

(Advertise)

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांचे कार्यकर्ते भूषण पाटील हे भाषण करीत असताना जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी वाद घातला. दोन्ही गटांमध्ये कुजबूज सुरू झाली होती. त्यानंतर हे प्रकरण हाणामारापर्यंत पोहोचलं. संवाद यात्रेमध्ये हाणामारीचा प्रसंग घडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवली आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह अन्य नेते संवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहचत आहेत. 

-

Post a Comment

0 Comments