सुशांत सिंह राजपूतच्या भावावर गोळीबार, आरोपींना अटक



 बिहारमधील सहरसा येथे ३० जानेवारी रोजी सुशांत सिंह राजपूतचा मामेभाऊ आणि मधेपुरा येथील यामाहा मोटरसायकलच्या शोरुमचे मालक असणाऱ्या राजकुमार सिंह यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.  या हल्ल्यामध्ये राजकुमार सिंह यांच्यासहीत त्यांचा १ कर्मचारीही जखमी झाला होता. बैजनाथपूर चौकाजवळ मोटरसायकलवरुन आलेल्या २ हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरु केला होता.

प्रकरण काय होतं..?

 सहरसाच्या पोलीस अधीक्षक लिपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना जमीनीसंदर्भातील वादातून घडली आहे. राजकुमार सिंह यांची हत्या करण्याची सुपारी देण्यात आली होती.  हा व्यवहार ५ लाखांमध्ये ठरवण्यात आलेला होता. राजकुमार सिंह यांचा छोटा भाऊ आणि शहरातील प्रसिद्ध व्यापारी उमेश दालान यांच्यादरम्यान मागील बऱ्याच काळापासून वाद सुरु होता.  उमेश दालान यांनी विक्की चौबे नावाच्या आरोपीला राजकुमार यांची हत्या करण्यासाठी पैसे दिले होते. मात्र आरोपींच्या हल्ल्यामध्ये राजकुमार सुदैवाने बचावले आणि त्यांना केवळ किरकोळ जखम झाल्याची माहीती आहे.

 तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या फोन लोकेशनच्या आधारे त्यांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आला. पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला असता या ठिकाणी  एका कुख्यात गुंडासहीत ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. सर्वजण गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Post a Comment

0 Comments