मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांचे निवासस्थानासमोर शेतकरी संघटनेचे पोस्टरबाजी आंदोलन


पंढरपूर/प्रतिनिधी:

भारतरत्न सचिन तेंडुलकर मुंबईतील निवासस्थानासमोर पंढरपूर तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी करत सचिन तेंडुलकर यांना प्रश्न विचारला आहे. "आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील" असा सवाल पोस्टरच्या माध्यमातून कार्यकर्ते उपस्थित केला आहे. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील रणजित बागल यांनी पोस्टरच्या माध्यमातून सचिन तेंडुलकर याला प्रश्न विचारला आहे.

(Advertise)

भारतरत्न सचिन तेंडुलकरने शेतकऱ्यांच्या बाजूने एक ट्वीत करावे...

रणजित बागल म्हणाले सचिन तेंडुलकर यांनी देशातील शेतकऱ्यांनी बद्दलही एक ट्विट करावे, आंदोलन शेतकऱ्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करावी अशी  इच्छा आहे. आम्हि पोस्टरच्या माध्यमातून तेंडुलकर यांना देशाविरुद्ध प्रचारात तसेच संकट विषयी जसे तुम्ही ट्वीट करतात, त्याचप्रमाणे देशातील शेतकरी अन्नदाते यांच्या विषयी ट्वीट करून त्याला उभारी देण्याचे काम करावे, अशी मागणी बागल यांनी शेतकऱ्यांच्या वतीने तेंडुलकर यांच्याकडे केली. ज्याप्रमाणे भारतरत्न सचिन तेंडुलकर धावांच्या मागे पडतो. त्याचप्रमाणे शेतकरी पिकाच्या मागे धावा करत असतो. त्याच प्रमाणे तेंडुलकर यांनी ही शेतकऱ्यांच्या बाजूने बोललेच पाहिजे, अशी मागणी केली.

(Advertise)

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला सचिन तेंडुलकरनं ट्विटद्वारे उत्तर दिलं होते. त्यानंतर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असणाऱ्यांनी सचिन तेंडुलकरनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यापूर्वी भूमिका का घेतली नाही असा सवाल उपस्थित केला होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील सचिनला सल्ला दिला होता.

Post a Comment

0 Comments