राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या ; अजित पवार संतप्त


विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या राज्यपालांनी थंड बस्त्यात टाकल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले आहेत. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. त्यांना भेटून नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यपाल नियुक्त सदस्यांची अजूनही नियुक्ती करण्यात आलेली नाही, याकडे अजित पवार यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर ते बोलत होते.

(Advertise)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना आम्ही १२ नावं दिली आहेत. सर्व नियम आणि अटी पाळून ही नावं दिली आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्रंही राज्यपालांना देण्यात आलं. याशिवाय आम्हाला पूर्ण बहुमत आहे. सभागृहातही १७१ आमदारांचं बहुमत सिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे आम्ही दिलेल्या नावावर राज्यपालांनी निर्णय घ्यावा, आता राज्यपालांनी अंत पाहू नये, असं अजित पवार म्हणाले.

Post a Comment

0 Comments