महाराष्ट्रात आता मतपत्रिकेचा पर्याय मिळणार विधानसभा अध्यक्ष


 आता राज्यातील निवडणूकांमध्ये मतदारांना ,ईव्हिएम मशीन ऐवजी मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी कायदा करण्यात यावा अशा सूचना राज्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधीमंडळाला दिल्या आहेत.

 भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद ३२८ प्रमाणे , राज्यातील निवडणुकांबाबत कायदा तयार करण्याचे अधिकार , राज्य विधानमंडळाला आहे. दरम्यान काल याबाबत एक मोठी बैठक झाली या बैठकीला महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत,राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग आणि राज्याचे विधी व न्याय विभागाचे सचिव भुपेंद्र गुरव आदी मोठे अधिकारी उपस्थित होते.

(Advertise)

दरम्यान राज्यातील जनतेला ईव्हीम व्यतिरिक्त ,मतपत्रिकेने मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशा सूचना या बैठकीत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत. राज्यात ईव्हीम मशीनचा अनेक वेळी विरोध करण्यात आला आहे , आता हा कायदा आल्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Post a Comment

0 Comments