बेवारस मृतदेहाला खांद्यावरून घेऊन दोन किलोमीटरचा रस्ता चालणारी लेडी सिंघम


हैद्राबाद : खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन नेहमीच कोणत्यान कोणत्या रुपात होत असत. अशीच एक घटना आंध्रप्रदेशात समोर आली आहे. आंध्रप्रदेशातील एका संवेदनशील महिला पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या कृतीतून आदर्श समोर ठेवला आहे. ग्रामीण भागातील एका बेवारस मृतदेहास खांद्यावरून दोन किलोमीटरचा प्रवास केला व स्वतःच त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केला. या जाबाज महिला उपनिरीक्षकांच नाव के. श्रीशा आहे.श्रीकाकुलम जिल्ह्यातील कासीबुग्गा इथं कार्यरत आहेत.

(Advertise)

श्रीकाकुलम जिल्ह्यातील पलासा कासीबुग्गा नगरपालिकेच्या आदिविकोट्टुरू गावात शेतातील लोकांनी एक अज्ञात मृतदेह पाहिला. पण कोणीही त्यावर अंत्यसंस्कार करण्यास तयार नव्हतं.
या घटनेची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीशा यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

गावात मृतदेह आढल्याने आधीच लोक घाबरले होते. त्यात कोणीही त्याजवळ जाण्यास तयार नाही. हे सगळं पाहिल्यानंतर श्रीशाने ललिता चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीशाने खांद्यावरुन दोन किलोमीटर प्रवास करत मृतदेह गावात नेला आणि स्वत: त्यावर अंत्यसंस्कार केले.


Post a Comment

0 Comments