शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करु, भाजपचा सरकारला इशारा


दरवर्षी १९ फेब्रुवारीला देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होते. महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध ठिकाणी बहुविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. पण, यंदा मात्र शिवजयंतीवर  कोरोना विषाणूच्या संसर्गाचं सावट असणार आहे. मागील काही दिवसांत कोरोनाची दहशत काहीशी कमी झाली होती, याच पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी पुन्हा खुल्या झाल्यामुळे शिवप्रेमींनी याही वर्षीचा शिवजयंती उत्सवाचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं ठरवलं होतं.

(Advertise)

 काही ठिकाणीतर किंबहुना अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे, काही ठिकाणी नाटक- व्याख्यानं आयोजित केली गेली आहेत. पण, बुधवारी राज्यात काल पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळं गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत.

 राम कदमांच्या पत्रात म्हणले आहे कि शिवजयंती साजरी करण्यावर निर्बध घालून पुन्हा एकदा हिंदूंचा अवमान करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या पत्राद्वारे माझी तुम्हाला विनंती आहे की, शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments