पंढरपूर/प्रतिनिधी:
पंढरपूर तालुक्यातील एका गावामध्ये तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सुखदेव भंगे (वय ४९) असे संशय आरोपीच्या विरोधात पोक्सो कलमांतर्गत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पंढरपूर तालुक्यातील एका गावात खाऊचे आमिष दाखवून सुखदेव भंगे यांनी तीन अल्पवयीन मुलींना घरात बोलावले, व त्या अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातील एका मुलीने सुखदेव यांच्या तावडीतून सुटका करून घेत आपल्या घरी जाऊन झालेला सर्व प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी गावातील लोकांना नागरिकांचे भोंगे यांच्या घरी जाऊन दोन अल्पवयीन मुलींचे सुटका केली, नागरिकांनी भोंगे यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणी संशयित आरोपी सुखदेव बोंगेच्या विरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यानिमित्ताने पंढरपूर तालुक्यातील महिला सुरक्षितेच प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
0 Comments