बापलेकीचा नात्याला काळीमा फासणारी घटना, पंढरपूर येथे मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पित्या विरुद्ध गुन्हा दाखल



पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर तालुक्यातील एका गावामध्ये बापाने स्वतःच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. क्रूर बापाविरोधात पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. याबाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जन्मदात्या बापाविरोधात पोक्सो कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जन्मदात्या बापानेच बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या आठ दिवसापासूनची दुसरी घटना आहे. 


आईकडून पतीविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील एका गावामध्ये एक मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहते. मात्र २०१८ पासून जन्मदात्या पित्याने मुलीला अत्याचार करण्याच्या हेतूने दमदाटी व शिवीगाळ करून विनयभंग करत होता. असाच प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सुरू होता. मात्र ३ फेब्रुवारी रोजी जन्मदात्या बापाकडून लेकीचा प्रकार आईच्या लक्षात आल्यानंतर आईने मुलीसोबत  पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत पतीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली.

(Advertise)

आठ दिवसांतील दुसरी घटना 

सदर  पित्याविरोधात पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये फिक्स को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन दिवसापूर्वी पंढरपूर तालुक्यातील एका गावांमध्ये तीन अल्पवयीन मुलींना खाऊचे आमिष दाखवून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता त्यातूनच हा दुसरा प्रकार उघडकीस आल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

Post a Comment

0 Comments