पतीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे पतिनेच पत्नीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना एमआयडीसी भागातील भीमनगरमध्ये घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दिप्ती अरविंद नागमोती (वय २६) असे मृत महिलेचे नाव आहे. दिप्तीचा पती अरविंद नागमोती (वय-३०) याचे बाहेर अनैतिक संबंध होते. यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. दरम्यान अनैतिक संबंधांना घेऊन दोघांमध्ये जास्त वाद होऊ लागले होते. सोमवारी (१५फेब्रुवारी) त्यांच्यामध्ये खूप वाद झाले. आणि ह्या वादाने वेगळे वळण घेतले. या वादात पतीने तिचा खून केला. आणि फरार झाला. दिप्तीच्या भावाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी फरार आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.
0 Comments