" छ.शिवाजी महाराजांची प्रशासन, न्याय व समाज व्यवस्था ही पुरोगामी व परिपूर्ण : प्रा.डॉ.वैशाली सारंग"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

कागलच्या डी.आर.माने महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून      
इतिहास मंडळाचे भित्तीपत्रक उद्घाटन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
      
सुरुवातीस  शिवाजीराजांचा व्यक्तीपटाचे दर्शन घडवणारे  विविध स्वरूपातील भित्तीपत्रके यांचे उद्घाटन  डॉ. वैशाली सारंग  यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांचे  या कलेचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
      

कार्यक्रमाच्या प्रारंभिक उपस्थितांचे  स्वागत इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष जेठीथोर यांनी करून प्रास्ताविकामध्ये  आजच्या युवा पिढीला  छत्रपती शिवाजी राजांची  विचार व कार्यपद्धती  समजावी व  त्यांच्यात नवचैतन्य निर्माण होऊन संस्कारक्षम पिढी घडावी ही अपेक्षा व आयोजनाचा हेतू त्यांनी स्पष्ट केला.  
       
डी.आर.माने महाविद्यालयाचा इतिहास विभाग नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असते. त्याच उपक्रमाचा एक विस्तारित भाग म्हणून "छ.शिवाजी महाराज यांचे विचार आणि आजची प्रस्तुतता" याविषयावर इतिहास विभाग प्रमुख डॉ. वैशाली सारंग डी. डी. शिंदे सरकार काॅलेज,कोल्हापूर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंग व्याख्यानामध्ये त्या म्हणाल्या की, छ.शिवाजी महाराज यांचे विचार आजच्या काळात समता व बंधुता निर्माण करण्यासाठी किती उपयोगाचे आहेत हे स्पष्ट केले. यासाठी सदय परिस्थितीला सुसंगत होतील अशी अनेक वास्तव उदाहरणे त्यांनी सांगितले.छ.शिवाजी महाराजांची प्रशासन, न्याय,  व समाज व्यवस्था ही पुरोगामी, परिपूर्ण व आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे   हे ही त्यांनी  स्पष्ट केले. त्यांच्या या विषयाच्या मांडणीमध्ये  शिवाजी राजांचे कृतिशील विचार कसे लाभदायक आहेत हे त्या  संदर्भात  सातत्याने पोटतिडकीने बोलत होत्या.
       

या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले म्हणाले की, आजची युवा पिढी संस्कारहीन व जय भवानी जय शिवाजी या घोषणेपुरती मर्यादित राहत असून त्यामुळे वेळीच आजच्या युवा पिढीला संस्काराचे डोस देणे गरजेचे आहे. या विद्यार्थ्यांच्यामध्ये महाराजांच्या कार्याची वास्तव माहिती व त्यांचे कृतीशील विचार पोहोचवणे गरजेच असून ते खूप महत्त्वाचे आहे.
       या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. राहुल पाटील यांनी केले. तर प्रा. शुभांगी गुरव यांनी सूत्रसंचालनाच्या माध्यमातून महाराजांच्या या व्याख्यानात सुसंगतपणा  आपल्या उत्तम वाणीने आणला. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. आदिनाथ गाडे,आबासाहेब चौगले,महाराजांच्या विचारांवर प्रेम करणारे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व सर्व शिवप्रेमी विद्यार्थ्यी कोव्हीड-१९ च्या नियमांचं पालन करून  उपस्थित होते. या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या सर्व घटकाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

1 Comments