'या' खेळाडूला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात घेणे अत्यावश्यक; सुनील गावस्कर यांचे स्पष्ट मत!


 पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला तब्बल २२७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.  पाचव्या दिवशी ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा खराब कामगिरी केली. 
 भारताचा दुसरा डाव फक्त १९७ धावात संपुष्ठात आला. 

(Advertise)

मालिकेतील दुसरा कसोटी सामना चेन्नईतील याच मैदानावर १३ फेब्रुवारीपासून सूरू होणार आहे.  हा सामना जिंकून विराट कोहली आणि टीम मालिकेत १-१ अशी बरोबर करतो का, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष असेल.

पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर आता भारतीय क्रिकेट संघ काय बदल करतो आणि कोणत्या रणनीती ने खेळतो हे जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे. 
याविषयी सुनील गावस्कर यांनी स्वतःचे मत व्यक्त केले आहे. "आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर हे दोन फिरकीपटू असताना कुलदीप यादव याला दुसऱ्या कसोटी सामन्यात अकरा खेळाडूंमध्ये घ्यायला हवे," असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

(Advertise)

 "आर अश्विन संथ गतीने हवेत चेंडू सोडण्यासाठी प्रसिद्ध आहे तर वॉशिंग्टन सुंदर हा वेगाने चेंडू सोडतो. त्यामुळे कुलदीप यादव हा तिसरा फिरकीपटू जर संघात सामील झाला, तर याचा फायदा भारतीय संघाला मिळेल. त्याच बरोबर गोलंदाजीमध्ये विविधता पाहायला मिळेल," असे देखील गावस्कर म्हणाले.

Post a Comment

0 Comments