केंद्रीय गृहमंञी अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या परिस्थितीवर लोकसभेत भाष्य केले आहे. यावेळी अमित शाह म्हणाले, "ज्यांना पिढ्यानपिढ्या राज्य करण्याची संधी दिली, त्यांनी त्यांच्या अंतकरणात डोकावून पाहावे की, ते हिशोब मागण्याच्या लायकीचे आहेत की नाही," असे म्हणत शाह यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला. तसेच, "कलम ३७० हटवण्याबाबतचा खटल्यावर कोर्टात दिर्घ सुनावणी सुरू होती आणि ते ५ न्यायाधीशांच्या खंडपीठात वर्ग करण्यात आले आहे," असे अमित शाह यांनी सांगितले आहे.
(Advertise)
अमित शाह पुढे म्हणाले की,"आता विरोधी पक्ष आम्हाला सांगत आहे की, सुप्रीम कोर्टासमोर जा आणि त्यांना लवकरात लवकर सुनावणी करण्याचे सांगा. आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर आहोत आणि देशात कलम ३७० असून नये यासाठी आम्ही समोर आहोत. सर्वोच्च न्यायालयात सध्या व्हर्जुअल सुनावणी होत आहे. या प्रकरणात व्हर्चुअल सुनावणी होऊ शकत नाही. जेव्हा फिजिकल सुनावणी पुन्हा सुरू होईल, तेव्हा हे प्रकरण ऐकले जाईल, असे शाह यांनी स्पष्टकरून सांगितले आहे.
तुम्ही कोणाच्या दबावाखाली इतके दिवस कलम ३७० लागू ठेवले? : अमित शाह यांनी कलम ३७० वरून कॉंग्रेसला पुन्हा एकदा धारेवर धरले आहे. अमित शाह म्हणाले की, आता हे लोक म्हणत आहेत की २जी चे ४जी आम्ही परदेशीयांच्या दबावाखाली बंद केले. हे मोदींचे सरकार आहे. ज्यात देश निर्णय घेतो आहे. आम्ही या सेवा काही काळासाठी बंद केल्या होत्या. जेणेकरून अफवा पसरू नये म्हणून. तुम्ही तर अटलजींच्या काळात मोबाईल बंद केले होते. सुखात आणि शांततेत जगणे हा नागरिकाचा सर्वात मोठा हक्क असल्याचे शाह यांनी सांगितले आहे. जिथे सुरक्षा नसेल तेथे कोणते हक्क असतील? मला हे विचारायचे आहे की, तुम्ही कोणाच्या दबावाखाली इतके दिवस कलम ३७० लागू ठेवले? असा थेट सवाल अमित शाह यांनी कॉंग्रेसला केला आहे.
काँग्रेसचा काळात हजारो लोक मारले जात होते : अमित शाह यांनी कॉंग्रेसवर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले, मी हा करार काळजीपूर्वक वाचतो आहे. आधीच्या सरकारने दिलेली आश्वासनेसुद्धा काळजीपूर्वक वाचून अंमलात आणली पाहिजेत. ३७० हे तात्पुरता करार होता. १७ महिन्यात तुम्ही आम्हाला हिशोब मागत आहात आणि ७० वर्षे तात्पुरते कलम ३७० वर्षे चालले, त्याचे उत्तर कोण देणार आहे? आम्ही येऊ-जाऊ, जिंकू-पराभूत होऊ, पण हे लक्षात घेऊन देशाला तसेच ठेवणार नाही. हा तुमचा विचार आहे. तुम्ही म्हणता की, अधिकाऱ्यांचा काम करण्याचा अधिकार जाईल. काश्मीरमध्ये अधिकारी का काम करु शकणार नाही? काश्मीर देशाचा भाग नाही का? काश्मीरच्या तरुणांना IAS आणि IPS बनण्याचा अधिकार नाही का? काँग्रेसचा काळ आठवा काय होत होते? हजारो लोक मारले जात होते आणि वर्षांनुवर्षे कर्फ्यू राहत होता, असे म्हणत अमित शाह यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.
0 Comments