सेक्स करताना पार्टनरच्या संमतीशिवाय कंडोम काढणं आता बेकायदेशीर होणार आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात आता यासंदर्भात कायदा होणार आहे.
अशाप्रकारे कायदा करणारं हे अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील पहिले राज्य ठरणार आहे. या कायद्याची आता जगभरात चर्चा सुरु झाली असून इतरही देशांमध्ये या कायद्याबाबत जागरुकता निर्माण होण्याची शक्यता आहे.
सेक्स हा एकमेकांच्या संमतीने जरी होत असला तरी पार्टनरच्या संमतीशिवाय काहीजण कंडोम काढून सेक्स करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी पार्टनरला ईजा तसेच मानसिक त्रास होऊ शकतो. यासंदर्भात बऱ्याच चर्चा आणि वाद झाल्यानंतर या कायद्यासंदर्भात जनजागृती झाली आणि सेक्स करताना पार्टनरच्या संमतीशिवाय कंडोम काढणं बेकायदेशीर ठरवणारं विधेयक आता येऊ घातलं आहे.
0 Comments