"जयसिंगपूर कॉलेजला जवाहरभाई शाह यांची सदिच्छा भेट: कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीबाबत समाधान मानले"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर या शैक्षणिक संस्थेस अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.जवाहरभाई शाह यांनी सदिच्छा भेट देऊन जयसिंगपूर कॉलेजने अल्पावधीत केलेल्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.
       
जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर हे शिरोळ तालुक्यातील सर्वात जुने असून शैक्षणिक,सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व इतर सर्व क्षेत्राच्या प्रगतीचे प्रमुख स्त्रोत आहे. या शिक्षण संस्थेने शैक्षणिक गुणवत्तेचा आलेखा बरोबर भौतिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असा कॉलेज परिसर निर्माण केला आहे. या शिक्षण संस्थेचे सचिव मा. जवाहरभाई शहा व त्यांचे कुटुंबियांनी कॉलेजला सदिच्छा भेट दिली. 
           
या सदिच्छा भेट कार्यक्रमामध्ये कॉलेजच्या सर्व प्राध्यापक व  प्रशासकीय कर्मचारी यांच्यात संवाद साधण्याचा नियोजन करण्यात आले. सुरुवातीस स्थानिक व्यवस्थापन समितीचे सचिव डॉ.महावीर अक्कोळे यांनी प्रमुख पाहुणे व त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत आपल्या साहित्यपूर्ण शैलीत संस्थेच्या वतीने करण्यात आले. यानंतर आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार यांनी अलीकडच्या  दोन वर्षांच्या काळात कॉलेजच्या प्रगतीचा आलेख चौफेर पद्धतीने कसा वाढला आहे याचा लेखाजोखा त्यांनी मांडला. तसेच सध्या सुरू असणाऱ्या शैक्षणिक व  कौशल्यपूर्ण कोर्सची माहिती दिली. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या कॉलेजमध्ये आपल्या कॉलेजचा शैक्षणिक कार्याचा वेगळा ठसा त्यांनी नमूद केला.
           
 अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. जवाहरभाई शाह मार्गदर्शन करताना म्हणाले की, जयसिंगपूर कॉलेजने अलीकडील काळात शैक्षणिक प्रगतीचा एक आदर्श नमुना निर्माण केला आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. परंतु NAAC मूल्यांकनाच्या  अनुषंगाने मा. प्राचार्यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजमधील प्रत्येक घटकाने उच्च दर्जाचे गुणाचे मूल्यांकन मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत यासाठी त्यांनी शनि शिंगणापूर येथील एका वास्तव व विज्ञानवादी घटनेचे उदाहरण दिले.आज पुणे विद्यापीठातील प्रथम क्रमांकाचे शैक्षणिक दर्जा टिकवणारा व वाढविणारा कॉलेज म्हणून तुळजाराम चतुरचंद कॉलेज बारामती या कॉलेजने शैक्षणिक दैदिप्यमान यश संपादित केले आहे.अशा प्रकारचे सुयश मिळविण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य मुरूमकर व त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांच्या अहोरात्र प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे यश मिळवण्यासाठी जयसिंगपूर कॉलेजने ही प्रयत्नशील रहावे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करुन त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर टी.सी. कॉलेजच्या तुलनेत या कॉलेजने केलेल्या प्रगती बाबत समाधान ही व्यक्त केले.
      
 
 या संवाद बैठकीमध्ये हर्षवर्धन शाह, सौ. लतिका जवाहर शाह,श्रीमती. चित्रा अभय शाह व श्रीमती शोभा मॅडम उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन  स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य अशोक शिरगुप्पे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.डॉ. सौ.सुनंदा शेळके यांनी केले. या कार्यक्रमास स्थानिक व्यवस्थापन समितीचे जिनेन्द्र दत्तवाडे मामा, प्रा.आप्पासाहेब भगाटे,महावीर पाटील अशोक मादनाईक,अड.आदिनाथ नरदे, अभिजीत अडदंडे, बाळासाहेब इंगळे, कॉलेजचे सर्व उपप्राचार्य,सर्व प्राध्यापक व शासकीय कर्मचारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments