जावयाची भीष्म प्रतिज्ञा, रावसाहेब दानवेंना पुढच्या निवडणुकीत घरी बसवणार हर्षवर्धन जाधव...


हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे या जावई सासरे यांच्या नात्यांमध्ये नेहमीच कटुता अख्या महाराष्ट्राने पाहिली आहे. एकमेकांवर आरोप करून हे दोघे त्यांच्यातील वाद आणि कटुता पुन्हा-पुन्हा चव्हाट्यावर आणताना आपल्याला दिसतात.हर्षवर्धन जाधव यांना नुकताच एका प्रकरणात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यामध्ये हर्षवर्धन जाधव यांच्यावरील गुन्हे रावसाहेब दानवे यांच्या दबावामुळे टाकण्यात आले असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

(Advertise)

 हाच धागा पकडत, हर्षवर्धन जाधव यांनी देखील 'रावसाहेब दानवे यांचा दबाव मोडून काढा आणि मला संरक्षण द्या' अशी मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी, "पुढच्या निवडणुकीत जर का दानवे यांना घरी बसवले नाही तर, मी माझ्या बापाची अवलाद नाही", असे उच्चार काढले आहेत.

Post a Comment

0 Comments