अपात्र रेशनकार्ड काधारकांची शोधमोहीम सुरु झाली - आता एक लाखावर उत्पन्न असल्यास रेशनकार्ड श्वेत होणार


 अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम राज्यात १ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे , यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होत आहे. तशी याविषयीची माहिती आपण याआधी सुद्धा घेतली , दरम्यान आता या शोध मोहिमेंतर्गत खासगी किंवा सरकारी क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीकडे केसरी शिधापत्रिका असेल
 
(Advertise)

 मात्र त्यांचे उत्पन्न १ लाखाच्यावर असेल तर त्याची केशरी शिधापत्रिका रद्द करून -  त्याजागी त्यांना श्वेत शिधापत्रिका देणे ही जबाबदारी समितीवर देण्यात आली आहे.

हे पुरावे आवश्यक

 भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबूक, विजेचे बिल, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, आदी पुरावे आवश्यक आहेत

तर रेशनकार्ड रद्द होईल

 कार्डधारकांना आवश्यक ते पुरावे सादर करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाईल. मात्र ते देण्यास असमर्थ ठरलो तर रेशनकार्ड रद्द करण्यात येईल. तसेच पुराव्याची तपासणी करताना काही संशयास्पद आढळले तरी सुद्धा रेशनकार्ड रद्द केले जाईल.

Post a Comment

0 Comments