सांगोला/प्रतिनिधी:
सांगोला तालुक्यात जर्किंगची लेस लाकडी खुंटीला बांधून खेळत असताना गळफास लागल्यामुळे नऊ वर्षे बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली, सोहम नागनाथ शेंडे असे बालकाचे नाव आहे ६ फेब्रुवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान सांगोला तालुक्यातील अचकदाणी या गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली.
अचकदाणी येथे नवनाथ शेंडे हे पत्नीसह मुलगा मुलगी आजीअसा परिवार आहे पती-पत्नी शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. सोहम हा इयत्ता तिसरी मध्ये शिकतो तर मुलगी पाचवी मध्ये आहे. ७ फेब्रुवारी रोजी नवनाथ शिंदे हे शेती कामानिमित्त पिसेवाडी येथे गेले होते, तर आई मनीषा मजुरीसाठी दुसऱ्यांच्या शेतामध्ये गेली होती,तर बहीण बाहेर गेली होती. घरी सोहम आणि आजी एकटीच होते सोहम हा घरात टीव्ही पाहत बसला होता, तर आजी पारूबाई ही अंगणात बसली होती.
सोहम टीव्ही पहात जर्किंग लेस लाकडी खुंट्याला बांधून गोल गोल फिरत होता त्यातूनच लेस खुंटीत अडकल्यामुळे अनवधानाने त्याला गळफास लागला व त्याचा जागीच मृत्यू झाला, आजी पारूबाई ला नातवाचा आवाज न ऐकू आल्यामुळे घरात गेली असता सोहम खुंटीला लटकलेल्या अवस्थेत दिसला त्यानंतर आजीने हंबरडा फोडला. यातूनच शेजारी असलेल्या महादेव शेंडे यांनी धाव घेतली व नवनाथ शेंडे यांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली नवनाथ शेंडे यांनी तत्काळ सांगोला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
0 Comments