वाकडी/प्रतिनिधी:
वाकडी मध्ये धनंजय हांडे यांच्या नेतृत्वाखाली विजयाची हॅट्ट्रिक साधली, आज सरपंच व उपसरपंच आजा निवडी झाल्या. यामध्ये सरपंच म्हणून सुनिता धनंजय हांडे यांचे तर उपसरपंच काशिनाथ वळेकर यांची निवड करण्यात आली.
यांच्या निवडीमुळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या काळात गावाचा विकास करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार व गावाचा कायापालट करणार असे प्रतिपादन काशिनाथ तळेकर यांनी उपसरपंच निवडीनंतर बोलताना व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालय वाकडी येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते, यांच्या निवडीनंतर फटाके व गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी धनंजय हांडे, डॉ बालाजी वळेकर, प्रकाश पाटील, दत्ता रगडे, विलास वळेकर, आश्रुबा वळेकर, जयसिंग वळेकर, नारायण वळेकर यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments