पुन्हा आम्हीच येणार..! : हसन मुश्रीफ


ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी -शिवसेना, काँग्रेस या महाआघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेले यश मोठे आहे त्यामुळे भाजपाचे विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस मी पुन्हा येईन असे म्हणतात हे शक्य होणार नाही. पुन्हा आम्हीच येणार असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. कागल गडहिंग्लज उतूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांच्या मुश्रीफ गटाच्या नूतन सरपंच, उपसरपंच सदस्यांचा सत्कार बीएड कॉलेज येथे झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

हसन मुश्रीफ म्हणाले, ग्रामविकास खात्याने गेल्या वर्षात दोन हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. एक लाख किलोमीटर पानंद रस्त्यांची कामे सुरु आहेत. मनरेगाच्या माध्यमातून पाच लाख घरांची कामे आज सुरु झाली.

(Advertise)

प्राथमिक शाळांच्या नादुरुस्त वर्गखोल्या दुरुस्त करण्याचा व अंगणवाड्या उभारण्याचा संकल्प करा. प्रत्येक गावात स्मशान शेड असले पाहिजे, आमचा सरपंच हा गोरगरिबांचे डोळे पुसणारा आहे, ठेकेदाराशी सबंध ठेवून भानगडी करणारा नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वसुलीची अट असणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

स्वागत संताजी कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ व प्रास्ताविक जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनी केले यावेळी जि. प. सदस्य युवराज पाटील मनोज फराकटे, प्रविणसिंह पाटील, गणपतराव फराकटे सतीश पाटील, वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, नगराष्यक्षा माणिक माळी, उपसमापती अजना सुतार, दिनकर कोतेकर, शकशिकांत खोत, रंगराव पाटील, देवानंद पाटील, प्रकाश गाडेकर, रमेश माळी, उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, शशिकांत खोत आदीसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments