लष्कर-ए-मुस्तफा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हिदायतुल्ला मलिक याला अटक करण्यात यश आलं आहे.जम्मू व अनंतनाग पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहीमेत त्याला जम्मू येथून अटक केली गेली. यावेळी त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक ग्रेनेड देखील हस्तगत करण्यात आलं आहे.
हिदायतुल्ला मलिकच्या अटकेमुळे दहशतवादी कारवायांशी निगडीत महत्वपूर्ण माहिती, भारतीय लष्कराच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक चौकशीत अशी माहिती समोर आली आहे की, जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याची त्याची योजना होती.
(Advertise)
काश्मीर घाटीत सक्रीय असेलली लष्कर-ए-मुस्तफा ही जैश-ए-मोहम्मद या दहशवतावदी संघटनेचाच भाग आहे. जम्मूचे एस.एस.पी. श्रीधर पाटील यांनी याबाबत सांगितले की, जम्मूमधील कुंजवानी जवळ दहशवतवादी हिदायतुल्ला मलिक याला अटक करण्यात आली. त्याच्यावर अटकेची कारवाई करतेवेळी त्याने पोलिसांवर हल्ला देखील केला होता.
0 Comments