परंडा/प्रतिनिधी:
परंडा तालुक्यातील सोनारी इथले जवान सागर पद्माकर तोडकरी यांना पठाणकोटमध्ये वीरमरण आलं आहे. शहीद सागर तोडकरी हे ब्रिगेड ऑफ गार्ड, १५ गार्ड पठाणकोट, पंजाब इथे भारतीय सैन्य दलात नाईक पदावर कार्यरत होते. कर्तव्य बजावताना सागर तोडकरी यांना वीरमरण आलं. सागर तोडकरी यांच्या अकाळी जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण सोनारी गाव आणि परंडा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
सागर हे २०१० साली सैन्य दलात भरती झाले होते. त्यांची ट्रेनिंग नागपूरच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये झाली होती. २०१५ मध्ये सागर यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांनी दोन्ही मुले लहान आहे. मुलगा ४ वर्षाचा तर मुलगी अवघ्या २ वर्षांची आहे. अवघ्या ४ महिन्यांपूर्वीच ते आपली पत्नी आणि मुलांना घेऊन पठाणकोटला गेले होते. पण सोमवारी पठाणकोट इथं कर्तव्य बजावत असताना ते शहीद झाले.
0 Comments