आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागढा खेळाडू ठरला ख्रिस मॉरिस


 
चेन्नई : २०२१ च्या आयपीएल लिलावात ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने १६ कोटी २५ लाख खर्च करत इतिहास घडवला आहे. कारण, आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस ठरला आहे. मॉरिसने भारताच्या युवराज सिंहचा विक्रम मोडीत काढला आहे. युवराजला दिल्लीने १६ कोटी रुपयांत खरेदी केले होते.

आरसीबी, चेन्नई, पंजाब आणि राजस्थान या संघाने ख्रिस मॉरिसला आपल्या संघात घेण्यासाठी रस दाखवला होता. माञ, राजस्थान संघाने १६ कोटी २५ लाख रुपये खर्च करत आपल्या संघात ख्रिस मॉरिसला सामावून घेतले आहे. ख्रिस मॉरिसने गतवर्षीच्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना ९ सामन्यात ११ बळी घेतले होते. गेल्या आयपीएलच्या लिलावत मॉरिसला १० कोटी रुपयांत आरसीबीने खरेदी केले होते. मात्र, यंदा आरसीबीने मॉरिसला करारमुक्त केले होते. 

आयपीएलच्या इतिहासातील यापूर्वीचे सर्वात महागडे कोण,वाचा...

१ ) युवराज सिंहसाठी मोजले होते १६ कोटी  : भारतीय संघाचा माजी धडाकेबाज फलंदाजांवर २०१५ मधीलच्या लिलावात १६ कोटी रुपयांची बोली लागली होती. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वातम मोठी बोली आहे. युवराजला दिल्लीने १६ कोटी रुपयांत विकत घेतले होते.

२) पॅट कमिन्स : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएलच्या लिलावात सर्वात महागडा वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. कमिन्सने बेन स्टोक्सला मागे टाकले होते. २०२० मध्ये कमिन्सला १५ कोटी ५ लाख रुपयांना कोलकातानं खरेदी केले होते. 

३) इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्लाला २०१७ मध्ये १४.५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते.

४) युवराज : २०१४ मध्ये युवराजला आरसीबीने १४ कोटी रुपयांत खरेदी केले होते.

५) बेन स्टोक्स : २०१८ मध्ये बेन स्टोक्सला राजस्थान रॉयल्स संघानं १२.५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे.



 

Post a Comment

0 Comments