राज्यातील ग्रामपंचायतींना मोठं गिफ्ट - उपमुख्यमंत्री अजित पवार

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामपंचायतींसाठी मोठी घोषणा केली आहे. ग्रामपंचायतींना गावाच्या विकासासाठी आणखी २९ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. ते पुण्यात बोलत होते.

या मिळणाऱ्या निधीचा उपयोग गावातील शाळा सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी झाला पाहिजे, हा निधी सत्कारणी लावा, असे आवाहनही अजित पवार यांनी सरपंच आणि ग्रामसेवकांना केले आहे. राज्यातील ग्रामपंचायतींना गावांच्या विकासासाठी आणखी २९ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केली. 

या निधीचा विनियोग गावकारभाऱ्यांनी चांगल्या कामासाठी करावा. निवडणुकीसाठी गावातील खालची-वरची आळी पालथी घालतो. पण निवडून आल्यानंतर ग्रामसेवकाला सहीसाठी सरपंच, सदस्यांना शोधावे लागते, असे होता कामा नये.

Post a Comment

0 Comments