कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पवार कधी कुस्ती खेळलेत का? - सदाभाऊ खोत

सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिनचे कान टोचले होते. यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीका केली होती. यी टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं आहे. पवार कधी क्रिकेट खेळले होते का?, सध्या ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कधी कुस्ती खेळली होती?, असा सवाल करत खोत यांनी पवारांवर निशाणा साधला होता. याला राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी उत्तर दिलं आहे.
(Advertise)

पवार साहेबांनी या वयात कुस्ती खेळणं यांना अपेक्षित आहे का?, आणि या निवडणुकीत पवार साहेबांनी कुस्ती काय असते हे दाखवून दिलं आहे. आपण ज्या नर्सरीत शिकता शरद पवार हे त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं असल्याचं मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे.

(Advertise)

दरम्यान, खोत यांचा मुलगा जिल्हा परिषदेमध्ये पडला आहे. कोणाच्या बाबतीत बोलावं हे त्यांना समजत नाही. सदाभाऊ खोत हे कडकनाथ कोंबडीवाले आहेत ते काहीही बोलू शकतात, असा टोलाही शेख यांनी लगावला.

Post a Comment

0 Comments