जयश्री राम बोलण्यावर ममता दीदींचा आक्षेप आहे. येथे जयश्री राम नाही बोलणार तर, मग पाकिस्तानात बोलणार का? असा सवाल केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगाल मुख्यमंञी ममता बॅनर्जी यांना केला आहे.
केंद्रीय गृह मंञी अमित शहा गुरुवारी पश्चिम बंगाल दौऱ्यावर गेले आहेत. तेथील कूचबिहारमध्ये एका रॅलीला शहा यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, परिवर्तन याञा मुख्यमंत्री, मंत्री किंवा आमदाराला बदलण्यासाठी नाही, तर राज्यातील परिस्थिती बदलण्यसाठी आहे. यानंतर सायंकाळी ते उत्तर 24 परगना जिल्हातील ठाकूरनगर येथील सभेला संबोधित करतील.
अमित शहा पुढे म्हणाले की, जयश्री राम बोलण्यावर ममता दीदींचा आक्षेप आहे. येथे जयश्री राम नाही बोलणार तर, मग पाकिस्तानात बोलणार का ? सर्वांनी हातवर उचलून माझ्यासोबत म्हणा... जय श्रीराम, जय जय श्रीराम। या घोषणेने ममता दीदींचा अपमान होतो. कारण त्यांना तुष्टीकरणातून एका विशिष्ट समाजातील मते हवेत. मला खाञी आहे, निवडणूक जवळ येईपर्यंत ममदा दीदी जय श्रीराम बोलतील, असे म्हणत अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
अमित शहा म्हणाले की, तृणमूल वाले म्हणता आहे की, भाजपचे लोक परिवर्तन याञा का काढता? मी आज त्यांना सांगायला आलो आहे की, ही कोणत्या मुख्यमंत्र्यांला बदलण्यासाठी किंवा आमदाराला पाडण्यासाठी आयोजित केली नाही. तर, ही बंगालची परिस्थिती बदलण्यासाठी आयोजित केलेली परिवर्तन याञा आहे. तुम्हाला घुसखोरीचा ञास होता का नाही? ममता दीदी घुसखोरी थांबवू शकत नाही का? ही घुसखोरी थांबवण्यासाठी ही याञा आहे. तुम्ही एकदा भाजपच्या हाती सत्ता तर द्या. मग बघा माणुस काय, एक पक्षीदेखील राज्यात येऊ देणार नाही, असे अमित शहा म्हणाले आहे.
मोदींना संधी द्या, सोनार बांग्ला करू : अमित शहा पुढे म्हणाले की, या वेळेसची परिवर्तन याञा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा भाच्चा अभिषेक बॅनर्जीचे भ्रष्टाचार संपवण्याची याञ आहे. ही यात्रा राज्याती बेरोजगारी संपवण्याची यात्रा आहे. ही यात्रा येथील बॉम्ब स्फोटांना बंद करण्याची यात्रा आहे. ही हिंसेच्या जागी विकास करण्याची यात्रा आहे. ही सोनार बांग्ला करण्याची परिवर्तन यात्रा आहे. तुम्ही ममता दीदींना खूप संधी दिल्या. आता नरेंद्र मोदींना संधी देऊन पाहा. राज्याला सोनार बांग्ला करू, असे अश्वासन अमित शहा यांनी बंगाल येथील जनतेला दिले आहे.
0 Comments